ज्वारीच्या भाकरी मध्ये किती कॅलरीज असतात?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 13:37

तुम्हाला ठाऊक आहे, एका चपातीत किंवा भाकरीत किती कॅलेरिज असतात ?
वजन घटवण्याच्या मिशनवर आहात ? मग पहा चपात्यांमधून तुम्हाला किती कॅलरिज मिळतात

भारतीय आहारात पोळी / चपाती हा एक प्रमुख पदार्थ आहे. कित्येकांचे दिवसातील एक जेवण हे फक्त चपाती - भाजी असते. तर काहींच्या दोन्ही वेळच्या आहारात चपातीचा समावेश असतो. मात्र तुम्ही वजन घटवण्याच्या मिशन असाल तर तुमच्या आहारातील पोळी शरीराला किती कॅलेरीज पुरवते हे ठाऊक असणे आवश्यक आहे.

सर्वसामान्यपणे , आहारातील पोळी ही कणकेची (गव्हाची) असते. परंतू इतरही काही पोषक घटकांपासून रोटी किंवा भाकरी केली जाते. मग पहा त्यात किती आहेत कॅलरीज

1 गव्हाची चपाती – 57 कॅलरिज

1 बाजरीची भाकरी– 97 कॅलरिज

1 नाचणीची भाकरी– 88 कॅलरिज

1 मक्क्याची रोटी – 153 कॅलरिज

1 थालिपीठ – 100कॅलरिज

1 तंदुरी रोटी – 116 कॅलरिज

1 फुलका – 57 कॅलरिज

1 रुमाली रोटी – 78 कॅलरिज

1 ज्वारीची भाकरी– 30 कॅलरिज

या विविध पोळ्यांमधील कॅलरिज पाहून त्यांची निवड करू नका. कारण कॅलरिजच्या सोबतीने त्यातील पोषकता देखील तितकीच आवश्यक आहे. इतर पोळ्यांच्या तुलनेत गव्हाच्या चपातीमध्ये कमीत कमी कॅलरिज असतात. परंतू नाचणीच्या भाकरीत अधिक पोषकता असल्याने त्यात कॅलरिजदेखील अधिक असतात. म्हणून विविध प्रकारच्या पोळ्या आहारात ठेवा. सामान्यपणे एका वेळेस एक व्यक्ती 2-3 पोळ्यांचा आहारात समावेश करते. मात्र वजन घटवणार्‍यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे कारण पोळ्यांचा आहारात अधिक समावेश करून कॅलरीज वाढवण्यापेक्षा एखादी पोळी कमी करून त्याऐवजी फळं किंवा भाजीचा आहारात समावेश करावा.

निरोगी स्वास्थ्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे.म्हणूनच तुमच्या शारीरिक गरजेनुसार योग्य आहार निवडण्यासाठी पोषणतज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. पोळ्यांमधील कॅलरिज तर पाहिल्यात पण काही अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात  हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info